‘इकॉलॉजिक’चा शहरी वनीकरण उपक्रम
11 Oct 2015

Indian EcoLogic Foundation - Urban Afforestation - Tree Plantation - इंडियन इकॉलॉजिक फाऊंडेशन - शहरी वनीकरण - वृक्षारोपण

इंडियन इकॉलॉजिक फाऊंडेशनने (IELF) या वर्षीच्या पर्यावरण दिनापासून शहरी वनीकरण (Urban Afforestation) हा अभिनव उपक्रम हाती घेतलाय. या उपक्रमाअंतर्गत गृहनिर्माण सोसायट्या, शाळा आणि महाविद्यालयांना IELF तर्फे आवाहन करण्यात येतं – “आपल्या आवारात झाडं लावण्यायोग्य जागा असेल तर आम्हाला कळवा. आम्ही तिथे येऊन स्वखर्चाने वृक्षारोपण करू. आपण फक्त त्याची योग्य काळजी घेण्याची हमी द्या.”
आणखी वाचा...

विशेष : हिरव्या रानातली तांबडी वाट...
30 Sep 2015

Jungle – Forest – Nature – Trees – Abhay Balkrishna Avasak - हिरव्या रानातली तांबडी वाट – जंगल – झाडे – निसर्ग - अभय बाळकृष्ण आवसक

झाडंच नसतील तर? श्वास कसा घ्याल? आज पाणी विकत घेतो आहे, उद्या ऑक्सिजन विकत घेणार का? मुलाबाळांना प्राणी-पक्षी फक्त चित्रांत दाखवणार का? पावसापाण्याचं वेळापत्रक बिघडलेलं असेल. आताच तापमान पन्नाशीच्या घरात पोहोचतंय. आणखी वर गेलं तर अचानक कुठेही आग लागू शकेल. असंच चालू राहिलं तर, तुम्ही साठवलेले पैसे असतील, पण खायला अन्न नसेल! प्यायला पाणी नसेल. वेळ निघून गेलेली असेल आणि आपल्या हातात असेल फक्त जर... आणि तर...
आणखी वाचा...

लेखक: अभय बाळकृष्ण आवसक
निसर्गप्रेमी आर्टिस्ट

फुलपाखरू छान किती दिसते...
6 Sep 2015

फुलपाखरू – रानवाटा – जंगल – वन्यजीव - सौरभ महाडिक – Butterfly – Ranvata – Forest – Wildlife – Saurabh Mahadik

फुलपाखरांशी मैत्री करणं ही संकल्पनाच किती सुंदर, मनाला मोहून टाकणारी आहे नाही? फुलपाखरांचं संशोधन, निरीक्षण, प्रकाशचित्रण हा खूप आनंद देणारा प्रवास आहे. हल्ली त्यामुळेच बटरफ्लाय गार्डनची संकल्पना आपल्याकडे रुजायला लागलीय. जगभरात १८००० जाती आढळतात आणि आपल्याकडे भारतात त्यांच्या एक हजारपेक्षा जास्त जाती सापडतात. फुलपाखरांना अंडी घालण्यासाठी लागणारी ‘फूड प्लांटस्’ आपल्या बागेत लावली, तर फुलपाखरांचं पूर्ण जीवनचक्र जवळून अनुभवता येतं.
आणखी वाचा...

लेखक: सौरभ महाडिक
पर्यावरण अभ्यासक

चिमुकले विश्व : अजगराच्या विळख्यात
6 Sep 2015

अजगर - चिमुकले विश्व – रानवाटा – जंगल – वन्यजीव – युवराज गुर्जर – Python – Chimukale Vishwa – Forest – Wildlife – Ranvata – Yuwaraj Gurjar

अजगर हा जगातल्या सर्वात लांब सापांपैकी एक आहे आणि तो जास्तीत जास्त २५ फुटांपर्यंत वाढल्याची नोंद आहे. अजगराची मादी नरापेक्षा जास्त वेगाने वाढते आणि ती जास्त मोठी असते. अजगर लांब आणि वजनदार असला, तरी झाडांवर सहज चढू शकतो आणि नंतर फक्त शेपटीच्या आधारे लोंबकळू शकतो. तसाच तो पाण्यातसुद्धा तेवढयाच सहजपणे वावरू शकतो. भारतात दोन जातींचे अजगर सापडतात आणि दोन्ही दुर्मिळ म्हणून गणले जातात. अजगराच्या कातडीला परदेशात प्रचंड मागणी आहे त्यामुळे त्यांची चोरटी शिकार मोठया प्रमाणावर होते.
आणखी वाचा...

लेखक: युवराज गुर्जर
मायक्रो आणि इन्सेक्ट फोटोग्राफीतले तज्ञ

‘इकॉलॉजिक’तर्फे भीमाशंकर वनकर्मचा-यांना रेनकोटचे वाटप
9 Aug 2015

Indian EcoLogic Foundation - Bhimashankar - Raincoats - इंडियन इकॉलॉजिक फाऊंडेशन - IELF - भीमाशंकर - रेनकोट

इंडियन इकॉलॉजिक फाऊंडेशन (IELF) या नॉन-प्रॉफिट संस्थेच्या वतीने भीमाशंकर अभयारण्यातल्या वनकर्मचा-यांना रेनकोटचं वाटप करण्यात आलं. रेनकोटअभावी वनकर्मचा-यांना पावसाळ्यात जंगलात गस्त घालण्याच्या व इतर कामांमध्ये अडचण येत होती. ही अडचण सूर करण्यासाठी IELF ने खास रेनकोट खरेदी करुन वन विभागाच्या सुपूर्द केले. “IELF ने अत्यंत योग्य वेळी ग्राउंड स्टाफला केलेली मदत कौतुकास्पद आहे. या कृतीमुळे पर्यावरण रक्षकांचा निसर्गप्रेमी नागरिक आणि संस्थांवरचा विश्वास दृढ झाला आहे,” अशा शब्दांत सीसीएफ सुनील लिमये यांनी IELF चं कौतुक केलं. “IELF च्या सहकार्यामुळे वनकर्मचा-यांची कार्यक्षमता वाढायला मदत होईल,” असा विश्वास आरएफओ तुषार ढमढेरे यांनी व्यक्त केला.
आणखी वाचा...

चिमुकले विश्व : सीतेचा अशोक
13 Jun 2015

Chimukale Vishwa – Sitecha Ashok – Yuwaraj Gurjar – Ranvata - चिमुकले विश्व - सीतेचा अशोक – वृक्ष - युवराज गुर्जर – रानवाटा

सीतेचा अशोक डेरेदार, काहीसा आंब्यासारखा पण आकाराने थोडा लहान असतो. याची पानं संयुक्त असतात आणि त्यांना ४ ते ६ पर्णदलं असतात. हिवाळ्यानंतर या झाडाला जेव्हा नवी पालवी फुटते ती अगदी नाजूक, तलम आणि गुलाबी, जांभळ्या रंगाची असते. या नवीन पालवीचे अनेक रंग असतात आणि जसजश्या त्या जून होत जातात तसतसे ते रंग बदलत जातात. या पालवीच्या लड्या अक्षरश: खाली लोळण घेत असल्यासारख्या लोंबत असतात आणि त्या शेवटपर्य़ंत तश्याच खाली माना टाकून असतात. या अप्रतीम पालवीमुळेच या झाडाला संस्कृतमधे ताम्रपल्लव आणि रक्तपल्लव अशी समर्पक नावं आहेत.
आणखी वाचा...

लेखक: युवराज गुर्जर
मायक्रो आणि इन्सेक्ट फोटोग्राफीतले तज्ञ

फोटोग्राफी गाईड : अस्वलांचं भांडण
8 Jun 2015

Photography Guide – Bear Fight – Daroji National Park – Baiju Patil – Wildlife – Ranvata - फोटोग्राफी गाईड – अस्वल - दारोजी नॅशनल पार्क - बैजू पाटील – वन्यजीव – रानवाटा

अस्वलांची फोटोग्राफी करण्यासाठी कर्नाटकातलं दारोजी नॅशनल पार्क अतिशय उत्तम अशी जागा आहे. इथे तुम्हाला अनेक अस्वलं दिसतील. त्यांचे जवळून फोटोही घेता येतील. परंतु बंदिस्त जीप किंवा ‘वॉच टॉवर’वरून तुम्हाला फोटोग्राफी करावी लागते. कारण अस्वलांनी माणसावर हल्ला केला, तर तो वाचण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे अस्वलांच्या फोटोग्राफीच्या वेळी अधिक दक्षता घ्यावी लागते.
आणखी वाचा...

लेखक: बैजू पाटील
सुप्रसिद्ध वाईल्डलाईफ फोटोग्राफर

विशेष : अरण्यात फिरताना…
8 Jun 2015

Jungle Reading - Forest - Wildlife - Saurabh Mahadik - Ranvata - अरण्यवाचन - जंगल - वन्यजीव - सौरभ महाडिक - रानवाटा

जंगल हे उघडय़ा पुस्तकासारखे असते. त्यात वन्यजीवांच्या पावलांची लिपी असते, झाडांच्या खोडावरील नक्षी असते, कुरतडलेली पाने असतात, वेगवेगळी विष्ठा असते, जागोजागी रेघोटय़ा किंवा खड्डे असतात. ही सगळी नवख्या निरीक्षकाला अगम्य वाटावी अशीच भाषा असते. जाणकार निरीक्षकाला खाणाखुणांचे अचूक अर्थ लागलीच कळतात. त्या अर्थांच्या साहाय्याने तो तिथे घडलेल्या घटनेचा अप्रत्यक्ष साक्षीदार बनतो.…. जंगल नावाचं पुस्तक कसं वाचायचं; असा प्रश्न ज्यांना सतावतो आहे, त्यांच्यासाठी काही खास टिप्स...
आणखी वाचा...

लेखक: सौरभ महाडिक
वन्यजीव अभ्यासक

डोंबिवलीत 'निसर्गोत्सव', माध्यम प्रायोजक 'रानवाटा'
25 May 2015

डोंबिवली, पूर्व येथील बालभवनमध्ये २९ ते ३१ मे या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन निसर्गप्रेमी नागरिकांसाठी खुले राहणार आहे. विशेष म्हणजे आवडलेली छायाचित्रे नागरिकांना विकतही घेता येणार आहेत. छायाचित्रांच्या विक्रीतून जमा झालेला निधी 'इंडियन ईकॉलॉजिक फाऊंडेशन' या संस्थेच्या माध्यमातून डोंबिवली परिसरात पर्यावरण संवर्धनासाठी वापरला जाईल. यात झाडे लावणे, वृक्षतोडीला आळा घालणे, शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागरुता निर्माण करणे, पक्ष्यांचे अधिवास वाचवणे अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे.
आणखी वाचा...

मचाण : वाघांच्या पलिकडले ताडोबा!
18 May 2015

Tadoba – Tiger – Jungle – Wildlife – Ranvata – Sanjay Deshpande -विशेष – ताडोबा – वाघ – जंगल - वन्यजीव – रानवाटा – संजय देशपांडे

बहुतांश पर्यटक हे ताडोबामध्ये फक्त वाघ बघण्यासाठी येतात, छायाचित्रं काढतात आणि वाघाचं दर्शन सेलिब्रेट करतात आणि निघून जातात. बस्स एवढंच! पण ताडोबाच्या संरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या अधिका-यांशी झालेल्या चर्चेतून आम्हाला जाणवलं की पर्यटकांना ताडोबा काय आहे, जंगलांचं महत्त्व काय आहे, जंगलांबाबत प्रत्येक नागरिकाची जबाबदारी काय आहे, जाणीव पर्यटकांना होणं महत्त्वाचं आहे.
आणखी वाचा...

लेखक: संजय देशपांडे
संचालक, संजीवनी डेव्हलपर्स

पाने